बामुच्या कुलसचिवपदी डॉ. जयश्री सुर्यवंशी

Aurangabad News Dr. Bamu's Registrar Jayashree Suryavanshi
Aurangabad News Dr. Bamu's Registrar Jayashree Suryavanshi
Updated on

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विविध संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी (ता.१७) केली. यात अधिष्ठाता, परीक्षा मंडळ, उपपरिसर संचालकांचा समावेश आहे.

कुलगुरुंनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. येवले म्हणाले, ‘‘विद्यापीठातील विविध संवैधानिक अधिकारी पदांसाठी ७, १३ आणि १४ मार्चला मुलाखती घेण्यात आल्या. नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना तीस दिवसांच्या आत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  सर्वाधिक ३९ अर्ज कुलसचिवपदासाठी आले होते. त्यातील १८ जणांनी मुलाखती दिल्या होत्या. प्र-कुलगुरु पदासाठी प्रक्रिया सुरु असुन तीही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’’

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. भालचंद बाबुराव वायकर, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रच्या अधिष्ठातापदी डॉ. प्रशांत शामराव अमृतकर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. वाल्मिक कचरु सरवदे तर, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. चेतना प्रल्हाद सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. वायकर आणि डॉ. सरवदे यांनी यापूर्वी अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेवर काम केले आहे. तर, डॉ. सोनकांबळे, डॉ. अमृतकर हे पहिल्यांदाच अधिष्ठातापदी विराजमान होणार आहेत.

परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. योगेश नारायण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाटील यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून कार्य केले आहे. तर, उस्मानाबाद उपपरिसरच्या संचालकपदी डॉ. दत्तात्रय कृष्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत.

पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला कुलसचिव
विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच कुलसचिवपदी महिला प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जयश्री सूर्यवंशी या वाणिज्यशास्त्र विभागप्रमुखपदी कार्यरत आहेत. परीक्षा मंडळ संचालकपदीही त्यांनी काम पाहिले आहे. पाच जानेवारी २०१५ पासून या पदावर प्रभारी व्यक्ती कार्यरत होती. १० नोव्हेंबर २०१७ पासून डॉ. साधना पांडे या प्रभारी कुलसचिवपदी कार्यरत आहेत. दरम्यान, डॉ. सूर्यवंशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ कुलसचिव पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com