Robotic Scavenger Machine : ड्रेनेज लाइनमधील मलबा काढण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर मशीनचा प्रयोग प्रशासकांसमोरच ‘फेल’!

सुधारणा करण्याच्या कंपनीला केल्या सूचना
drainage line cleaning Robotic scavenger machine experiment failed in front of administrators
drainage line cleaning Robotic scavenger machine experiment failed in front of administratorssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : चोकअप झालेल्या ड्रेनेज लाइनमधील मलबा काढण्यासाठी केरळच्या कंपनीने महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासमोर मंगळवारी (ता.२३) रोबोटिक स्कॅव्हेंजर या अत्याधुनिक मशीनचे सादरीकरण केले.

पण या मशीनद्वारे केवळ मेनहोलमधील कचरा, मलबा काढण्यात आला. त्यासोबत तुंबलेल्या लाइन मोकळ्या करण्याची यंत्रणा असावी, अशा मशीनची महापालिकेला गरज आहे. त्यानुसार या मशीनमध्ये सुधारणा कराव्यात, असे जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

drainage line cleaning Robotic scavenger machine experiment failed in front of administrators
Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी थांबवली एसी लोकल, कारण...

डॉ. सलीम अली उद्यानातील मेनहोलमध्ये पडून तीन जणांचा दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी तुंबलेल्या ड्रेनेजलाइन खुल्या करणाऱ्या अत्याधुनिक मशीनचा शोध घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

महापालिका अधिकाऱ्यांनी नागपूर महापालिकेशी संपर्क साधून रोबोटिक स्कॅव्हेंजर हे अत्याधुनिक मशीन तयार करणाऱ्या कंपनीची माहिती घेतली. कंपनीसोबत संपर्क साधल्यानंतर त्यांनी मंगळवारी शहरात सादरीकरण करण्याची तयारी दर्शविली. दुपारी सव्वाबारा वाजता मशीनचे सिडको एन-१ येथे सादरीकरण करण्यात आले.

केरळमधील जेनरोबोटिक्स या कंपनीने तयार केलेल्या या मशीनचे काम जी. श्रीकांत यांनी अर्धातास पाहिले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मेनहोलमध्ये असलेला कचरा, मलबा मशीन बकेटच्या साह्याने काढते. ड्रेनेजमध्ये जाणारे बकेट कॅमेऱ्याच्या साहाय्याने जोडलेले आहेत. त्यामुळे मेनहोलमधील गाळ, कचऱ्याची मशीनवर असलेल्या स्क्रीनवर माहिती मिळते.

मेनहोलमधून काढलेला कचरा एका प्लेटच्या साहाय्याने मशीनमध्ये टाकता येतो. त्यासाठी कामगारांना कचरा, मलब्याला हात लावण्याची गरज पडणार नाही, कोणाला मेनहोलमध्ये उतरण्याची गरज नाही.

drainage line cleaning Robotic scavenger machine experiment failed in front of administrators
Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्रीत पहिल्या महिला सभापतीपदी अनुराधा चव्हाण विराजमान

कंपनीच्या सादरीकरणानंतर प्रशासकांनी मेनहोलमधील कचरा, मलबा काढणे हे काम मशीन करते; पण त्यासोबत मेनहोलला जोडणाऱ्या लाइन तुंबलेल्या असतील त्या मोकळ्या करण्याची यंत्रणा अपेक्षित आहे. महापालिकेकडे पाणी ओढून घेणाऱ्या तसेच पाण्याचा मारा करणाऱ्या जेटिंग मशीन आहेत; पण मेनहोलला जोडणाऱ्या तुंबलेल्या लाइन मोकळ्या करणाऱ्या मशीनचा शोध आम्ही घेत आहोत.

त्यामुळे या मशीनमध्ये सुधारणा करावी, अशी सूचना जी. श्रीकांत यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी सफाई कर्मचारी आयोगाचे चेअरमन एम. व्यंकटेशन, माजी नगरसेवक मनोज गांगवे, शहर अभियंता ए. बी. देशमुख कार्यकारी अभियंता डी. के. पंडित उपअभियंता अमोल कुलकर्णी यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

drainage line cleaning Robotic scavenger machine experiment failed in front of administrators
Chatrapati Sambhaji Nagar: तळपत्या उन्हात शेतकऱ्यांचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा; कारण, अनुदान...

एक-दोन मशीन खरेदी करणार

दरम्यान पत्रकारांसोबत बोलताना जी. श्रीकांत म्हणाले, की केंद्र शासनाने मैला डोक्यावरून वाहून नेण्यास बंदी घातली आहे. तसेच शहरात मेनहोलमध्ये ड्रेनेज दुरुस्तीसाठी उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारची यापुढे जीवित हानी होऊ नये, यासाठी एक दोन अत्याधुनिक मशीन खरेदी करून त्याचा वापर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com