Sambhaji Nagar News : शहरातील धूलीकण धोकादायक पातळीवर, तज्ज्ञांकडून चिंता ; १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांना छातीविकार

काय उपया-योजना करता येतील, याविषयी मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात तज्ञांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑनलाइन पद्धतीने जी. श्रीकांत बैठकीत सहभागी झाले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे प्रदूषणाच्या पातळीत वाढच होत आहे. विशेषतः शहर परिसरातील औद्योगिक वसाहती लगत असलेल्या नागरी वसाहतींमधून एक ते १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांना छातीचे विकार होत असल्याबद्दल मंगळवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. शहरातील हवेतील धूलीकण सध्या १०४ एवढ्या धोकादायक पातळीवर आहे.

शहरातील हवेच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. त्यातून काय उपया-योजना करता येतील, याविषयी मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात तज्ञांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑनलाइन पद्धतीने जी. श्रीकांत बैठकीत सहभागी झाले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपायुक्त सोमनाथ जाधव, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे सल्लागार डॉ. गीतांजली कौशिक, निरीचे राहुल व्यवहारे, असरचे विराटसिंह, सुहास जोशी, आंतरराष्ट्रीय सर्क्युलार इकॉनॉमी तज्ज्ञ स्वाती सिंह व छातीविकाराचे तज्ज्ञ डॉ. श्रेयस बर्दापूरकर, पर्यावरण तज्ञ सैय्यद असिफ अली यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रीसर्च संस्थेचे अधिकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, ‘‘महापालिकेचे प्रत्येक पाऊल हवा स्वच्छ ठेवण्याची दिशेने आहे.

इंदूर शहर सर्वात स्वच्छ असूनही हवेची गुणवत्ता खराब आहे. त्यामुळे हवा स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘हम होंगे कामयाब’ मोहिमेअंतर्गत शहरात कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ४७ टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. सोबतच व्हर्टिकल गार्डन, कारंजे, ग्रीन बेल्ट विकसित करणे, फूटपाथ तयार करणे, स्विपिंग मशीन खरेदी करून त्यामार्फत धूळ कमी करणे, ई-बसेस घेणे असे निर्णय महापालिकेने घेतले आहेत.’’ यावेळी राकेश कुमार म्हणाले, ‘‘उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमाने हवेची गुणवत्ता मोजण्याचे प्रयत्न केले पाहिजे.’’

बसस्थानक धोकादायक

मध्यवर्ती व सिडको बसस्थानक प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वाधिक धोकादायक आहे.

बसस्थानकात दिवसभरात सुमारे तीन हजार गाड्या येतात. त्यातून निघणारा धूर व उडणारी धूळ प्रचंड आहे.

तीन-चार वर्षांपासून १ ते १५ वयोगटातील मुलांमध्येसुद्धा छातीचे विकार आढळून येत आहेत. हे रुग्ण औद्योगिक वसाहतीच्या परिघातील आहेत. पूर्वी वृद्धांना छातीविकार होत असे.

— डॉ. श्रेयस बर्दापूरकर, छातिविकर तज्ज्ञ

६८ कोटी मिळाले ५१ कोटी खर्च

गीतांजली कौशिक यांनी सांगितले, ‘‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम व १५ व्या वित्त आयोगामार्फत महापालिकेला आतापर्यंत ६८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.’’ गीतांजली कौशिक यांनी सांगितले, ‘‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम व १५ व्या वित्त आयोगामार्फत महापालिकेला आतापर्यंत ६८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com