esakal | ई-पिक पाहणी प्रकल्पाला १५ ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ । E-PIK
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पिक पाहणी प्रकल्पाला १५ ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ

ई-पिक पाहणी प्रकल्पाला १५ ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोयगाव: ई-पिक पाहणी या खरीप हंगाम कालावधीसाठी राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत गुरुवारी मुदतवाढ देण्यात आली असून आता शेतकरी स्तरावर कामाची कालमर्यादा ता.१५ ऑक्टोंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य स्तरीय अंमलबजावणी समितीने सध्या स्थितीतील अतिवृष्टी, पूर स्थिती, आणि झालेले खरीपाचे नुकसान याच्या विचाराधीन राहून हि मुदत वाढ दिली असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.

हेही वाचा: औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा

शेतकऱ्यांनी शेतातूनच राज्य शासनाने विकसित केलेल्या ई-पिक पाहणीच्या अप्स द्वारे थेट मोबाईल वरून पिक पेरा नोंदविण्यासाठी हि योजना ता.१५ आगस्ट पासून अमलात आणली होती या योजनेची अंतिम मुदत ता.३० सप्टेंबर पर्यंत होती परंतु अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा विचार करून अंमलबजावणी समितीने या योजनेच्या मुदत वाढीला हिरवा कंदील दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे आता शेतकरी कामाची कालमर्यादा ता. १५ आक्टोंबर पर्यंत पोहचली असून तलाठ्या आणि मंडळ अधिकाऱ्यांनी मात्र इ-पिक पाहणीत शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या पिक पेरयाला मान्यता देण्याचे काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याने आता शेतकरी स्तरावरील काम आणि मान्यता देण्याचे काम एकत्रीर्त रित्या पार पडणार आहे.जिल्ह्यात पहिल्या पासून अव्वल स्थानावर असलेल्या सोयगाव तालुका अद्यापही अव्वल असून सोयगाव तालुक्यात ११३६९ शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी द्वारे पिक पेरे नोंदविले असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले आहे.आता पुन्हा या योजनेला मुदत वाढ दिल्याने आता पुन्हा या कामात सोयगाव तालुक्यात वाढ होणार आहे.

हेही वाचा: मित्रानेच केला मित्राचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

तलाठ्यांना मंजुरीचे निर्देश

शेतकऱ्यांनी मोबाईल द्वारे अप्स वर नोंदविलेल्या पिक पेऱ्यांना तलाठी स्तरावर तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिल्याने शेतकरी स्तर आणि तलाठी स्तर या दोन्ही स्तरावरील काम एकत्रीर रित्या होणार आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष पिक पाहणीच्या कामासाठी ता.१५ आगस्ट पासून सुरुवात झाली होती त्यानंतर पुन्हा दोनवेळा मुदत वाढ मिळाल्यानंतरही तिसऱ्यांदा या योजनेला मुदत वाढ मिळाली आहे.

loading image
go to top