चिमुकल्यांच्या कलागुणांना ट्विंकलिंग स्टारमध्ये बहर; कल्पकतेतून साकारल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती

चिमुकल्यांच्या कलागुणांना ट्विंकलिंग स्टारमध्ये बहर; कल्पकतेतून साकारल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती
Published on
अँकर १ -- चिमुकल्या हातांनी साकारले पर्यावरणपूरक गणराया ‘ट्विंकलिंग स्टार’मध्ये गणपती मूर्ती निर्मिती स्पर्धा ः विजेत्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान -- बीड, ता. १० ः पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव लहान वयातच रुजावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने शिवाजीनगर येथील ट्विंकलिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी (ता. दहा) १०० पेक्षा अधिक चिमुकल्यांनी शाडूच्या मातीपासून गणरायाच्या सुबक मूर्ती साकारल्या. स्वतःच्या हातांनी मूर्ती घडविताना विद्यार्थ्यांनी कलागुणांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. गणपती मूर्ती निर्मिती स्पर्धेत चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या विविध रूपांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे तांत्रिक व शास्त्रोक्त धडे प्रियानी गोरे यांनी दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकारांच्या, विविध भावमुद्रा असलेल्या देखण्या गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी तयार केल्या. हा उपक्रम अतिशय निटनेटक्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्राध्यापक अश्विनी वळे, स्नेहल माने, दीपिका कदम, स्वाती महाकुंडे, आशा धापसे, सुचिता देवगुडे, मनीषा डापकर आणि उषा गोरे यांच्यासह शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा धापसे यांनी केले. --- चौकट उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा सन्मान स्पर्धेअंती तयार करण्यात आलेल्या उत्कृष्ट व कलात्मक मूर्तींची निवड करून विजेत्यांना ट्रॉफी (ढाल) देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक कांचन गोसावी, द्वितीय क्रमांक शुभांगी हाके, तर तृतीय क्रमांक दीप्ती बडे यांनी मिळविला. उपमुख्याध्यापक दीपक जहा यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com