मुलीच्या तक्रारीनंतर बालविवाह कायद्याखाली आठ जणांवर गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलीने केंद्रीय महिला व बालविकास खात्याकडे केली होती तक्रार
Prohibition of Child Marriage Act
Prohibition of Child Marriage ActProhibition of Child Marriage Act

औसा (लातूर): औसा तालुक्यातील सारोळा येथे झालेल्या एका बालविवाह संदर्भात औसा पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अल्पवयीन विवाहित मुलीने चाईल्ड हेल्पलाईनवर फोन करून या बाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सारोळा गावाचे ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता, एका पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह झाल्याचे उघड झाल्याने सदर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून मुलीचे आई वडील, सासू सासरे, नवरा, अन्य दोन लग्न जमविणारे व लग्न लावलेल्या ब्राम्हणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तरधरवाडी (ता. औसा) येथील एका पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह औसा तालुक्यातील सारोळा गावातील मुलाशी १७ मे २०२० रोजी लावण्यात आला होता. या अल्पवयीन मुलीला त्रास असल्याने तिने केंद्रीय महिला व बालविकास खात्याच्या चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केली होती. त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण खात्याचे पत्र औसा पोलिसांना आल्याने औसा पोलिसांनी सारोळा गावाचे ग्रामसेवक धनंजय शहापुरे यांना चौकशी करण्यासाठी सांगितले.

चौकशीत लग्न झाले त्यावेळी मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हणमंत शिंदे (सासरा), शांताबाई शिंदे ( सासू ), दत्ता दंडगुले (वडील), शिवकांता दंडगुले (आई), किरण शिंदे (पती), यल्लपा बंडगर (लग्न जमविणारे) गुरुबाई शिवराम चव्हाण (आज्जी) व लग्न लावणारा अनोळखी ब्राम्हण यांच्यावर मंगळवारी (ता.१३) रोजी औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com