esakal | औरंगाबादेत कोरोनाचा आठवा बळी, गारखेड्यातील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

‌47 वर्षीय वाहनचालक असलेला हा रुग्ण गारखेड्यातील गुरुदत्तनगर येथे राहत होता. त्याला सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होता. कोविडची लक्षणे समजून त्याच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते.

औरंगाबादेत कोरोनाचा आठवा बळी, गारखेड्यातील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : शहरात कोविड -19 विषाणूचे संकट आणखी गडद होतानाच कोरोनामुळे आठवा बळी गेला. गुरुदत्तनगर, गारखेडा परिसरात राहणाऱ्या
47 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

‌47 वर्षीय वाहनचालक असलेला हा रुग्ण गारखेड्यातील गुरुदत्तनगर येथे राहत होता. त्याला सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होता. कोविडची लक्षणे समजून त्याच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते.

तो पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घाटीच्या कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याला न्यूमोनिया झाला होता, हे त्याचा काढण्यात आलेल्या एक्सरेवरुन स्पष्ट झाले. त्याला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. आज (ता. 1) पहाटे साडे सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला

त्याचा प्लुमोनरी एम्बोलीजम सेकंडरी टू कोविड -19 असोसिएटेड कोग्युलोपॅथी विथ बॅक्टेरिअल प्लुमोनिया विथ अक्यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम या कारणाने मृत्यू झाला.

आतापर्यंत झालेले मृत्यू 

  • ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
  • १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
  • १८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू. 
  • 28 एप्रिलला किलेअर्क येथील महिलेचा मृत्यू 
  • 1 मे  गुरुदत्तनगर, गारखेडा येथील 47 वर्षीय  वाहनचालकाचा मृत्यू. 
     
loading image