esakal | स्वातंत्र्यानंतरही मरण यातना संपेना! अहो माणुसकी गेली कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : मतदानाचा हक्क बजावूनही मुखेड तालुक्यातील सोनानाईक व मुन्नानाईक तांडा येथील नागरिकांना ७४ वर्षानंतरही रस्ता नसल्याने कसरत करावी 
लागत आहे.

स्वातंत्र्यानंतरही मरण यातना संपेना! अहो माणुसकी गेली कुठे?

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : वैज्ञानिक क्रांतीमुळे लोक चंद्रावर चालले आहेत. बुलेट ट्रेन्सही धावत आहेत. गावखेड्यांना मुख्य रस्त्यांना जो़डण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्यापही असंख्य वाडीतांडे असे आहेत की, ७४ वर्षांनंतरही तेथे रस्तेच नाहीत. परिणामी येथील नागरिकांना जगण्यासाठी मरण यातना भोगल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. मुखेड (Mukhed) तालुक्यातील कोटग्याळवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सोनानाईक तांडा (Sonanaik Tanda) व मुन्नानाईक तांडा (Munnanaik Tanda) येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही रस्त्याची व्यवस्था केलेली नाही. तांड्यात एखादी व्यक्ती आजारी पडली, तर त्याला खाटेवर टाकून उचलून न्यावं लागते. पावसाळ्यात सर्व शेतात पेरलेले असते. still sonanaik tanda and munnanaik tanda of nanded district not get basic amenties glp88

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

त्यामुळे दळणवळणासाठी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. कारण ह्या दोन्ही तांड्याला रस्ताच नाही. शेतातून जावं लागतं. स्वातंत्र भारताच्या ७४ वर्षानंतर जर येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले असतील तर हे लोकं नेमकं भारतातच राहतात का हा प्रश्न पडला आहे. हे दोन तांडे एक हजार लोकवस्तीचे असून मुखेड तालुक्यापासून अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच मुक्रमाबाद येथील बाजारपेठेपासून १२ ते १४ किलोमीटर अंतरावर आहेत. ना पांदण रस्ता नाही ना पाऊल वाट, शेतकऱ्यांच्या शेतीच्या धुऱ्यावरून वाट काढत काढत तांड्याला जावे लागते. निवडणूक काळामध्ये या तांड्यावर मतदान बुथ देण्यात येते. पण मतदान अधिकाऱ्यांना सुद्धा मतपेट्या डोक्यावर घेऊन या तांड्यावर जावे लागते.

हेही वाचा: हरिभाऊ बागडेंच्या इशाऱ्यानंतर रस्त्यावरील खड्डे अखेर बुजवले

अशी करावी लागतेय कसरत

या तांड्यातील नागरिकांना मुक्रमाबाद येथे येण्यासाठी सावळी तांडा किंवा कोटग्याळ वाडी या ३०० मीटर अंतर गावाकडे शेतीच्या धुऱ्यावरून येऊन मुक्रमाबाद गाठावे लागते. यातच जर कोणी नागरिक आजारी पडला तर त्यांना मात्र खाटेवर घालून चार जणांना उचलून आणावे लागते. धुऱ्यावरून जर मोटरसायकल गेली आणि पंक्चर झाली, तर दुचाकीलाही असेच उचलून आणावे लागते. पावसाळ्यामध्ये तर या तांड्याची हलत न विचारलेली बरी. कोणत्याही राजकारण्यांनी किंवा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सुद्धा अद्यापपर्यंत तांड्याला भेट दिलेली नाही. मतदानासाठी मात्र आश्वासनाच्या खैरातीशिवाय दुसरे काहीच तांडावासियांच्या नशिबात नाही.

हेही वाचा: निलंग्यासह तालुक्यात जोरदार पाऊस, शाळेचे कंपाऊंड गेले वाहून

गोरसेना झाली आक्रमक

येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापर्यंत जर या रस्त्याचे काम सुरू केले नाही, तर मुखेड तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोरसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठवविलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर मुखेड गोरसेनेचे तालुकाध्यक्ष विजय जाधव, मुखेड गोरसेनेचे तालुका उपाध्यक्ष-वसंत जाधव, तालुका सचिव भीमसिंग चव्हाण व तालुका उपाध्यक्ष-अंकुश राठोड यांच्या सह्या आहेत.

loading image