
Eknath Shinde
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं रखडली. ही लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेणार आहे’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या पक्ष गटप्रमुखांच्या मेळाव्यात शुक्रवारी (ता. १०) केली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही त्यांनी फोडला.