Aurangabad : गो-ग्रीन’ योजनेमधून वीजग्राहकांनी वाचविले २१ लाख

महावितरणच्या ''गो-ग्रीन'' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत आहे. त्यामुळे सहभागी ग्राहकांची वीजबिलात वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
Electricity consumers saved 21 lakhs
Electricity consumers saved 21 lakhs sakal

औरंगाबाद - महावितरणच्या ''गो-ग्रीन'' योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील पर्यावरणस्नेही १७ हजार ३६४ ग्राहकांकडून २० लाख ८३ हजार ६८० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.

महावितरणच्या ''गो-ग्रीन'' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत आहे. त्यामुळे सहभागी ग्राहकांची वीजबिलात वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ''गो-ग्रीन''मधील ग्राहकांना ''ई-मेल''द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ''एसएमएस''द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता ‍सचिन तालेवार यांनी केले आहे.

औरंगाबाद शहर मंडळात ८ हजार ९३८ ग्राहक ''गो-ग्रीन'' योजनेत सहभागी झाले आहेत. औरंगाबाद ग्रामीण मंडळात ''गो-ग्रीन''मध्ये ५ हजार ४२४ ग्राहक सहभागी आहेत. तसेच जालना मंडळातील ३ हजार २ ग्राहकांनी ''गो-ग्रीन''मध्ये सहभाग घेतला आहे.

महावितरणच्या ''गो-ग्रीन'' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी.

याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ''गो-ग्रीन'' योजनेत ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करता येते. सोबतच मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपातही उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com