Sambhaji Nagar : संभाजीनगर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्याच्या मुलाला कसलीही निविदा प्रक्रिया न राबवता विजेचे कंत्राट

खंडपीठात याचिका; अधिकाऱ्यांना नोटिसा
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्याच्या मुलाला कसलीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट ग्रामीण भागातील वीजजोडणी व दुरुस्तीचे काम दिल्याप्रकरणात आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या येथील खंडपीठात दाखल करण्यात आली.

याप्रकरणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणच्या तेरा अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या कंत्राटाशी संबंधित कारवाई ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहील, असे आदेशात स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला अपेक्षित आहे.

याप्रकरणी शेख हबीब फरीद यांनी अॅड. गिरीश थिगळे-नाईक यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली. याचिकेनुसार शेख हबीब हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ग्रामीण भागातील वीजजोडणी व दुरुस्तीच्या कामाचे अंदाजे १० कोटींचे कंत्राट २०१९ला असोसिएशनच्या सदस्यांना मिळालेले आहेत.

परंतु चालू कामाच्या कोणत्याही निविदा न काढता यातील मुख्य काम अजिंक्य मुरहरी केळे यांच्या एजन्सीला थेट वाटप करण्यात आले. संबंधित एजन्सीचे जीएसटीचे प्रमाणपत्र हे अजिंक्य केळे यांच्या नावाचे असून ते संभाजीनगरच्या मुख्य अभियंत्यांचा मुलगा असल्याचे याचिकेत नमूद आहे. संबंधित मुख्य अभियंत्याच्या मुलाच्याच एजन्सीला व इतरांना अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता नियुक्ती दिली जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे कामाचे वाटप बेकायदेशीर आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. महावितरणकडून अ‍ॅड. ए. एस. बजाज, याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. गिरीश नाईक-थिगळे, व शासनाच्या वतीने अ‍ॅड. एस.के. तांबे काम बघत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com