Sambhaji Nagar : महानगरपालिकेत पुन्हा पदभरती ; आधी सव्वाशे अन् आता भरणार २७४ जागा

महापालिकेतील १२३ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासोबत आणखी २८३ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार रिक्त २७४ पदांचा मसुदा तयार करून प्रशासनाने शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीला पाठविला आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील १२३ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासोबत आणखी २८३ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार रिक्त २७४ पदांचा मसुदा तयार करून प्रशासनाने शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीला पाठविला आहे. या कंपनीकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिकेतील हजारो कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रिक्त पदांवर टप्प्याटप्प्‍याने नोकरभरती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२३ रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीतर्फे केली जात आहे.

अग्निशमन विभागातील २९ पदांसाठी सुरवातीला ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कंपनीकडून अंतिम करण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar Accident : काळ बनून आलेल्या ‘हायवा’ने घेतला दोन भाऊ, बहिणीचा बळी ; छत्रपती संभाजीनगरातील बाळापूर फाट्याजवळ दुर्घटना

दरम्यान, राज्य शासनाने २८३ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी आयबीपीएस कंपनीवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याती २७४ रिक्त पदांचा नियमानुसार मसुदा तयार करण्यात आला असून, हा मसुदा आयबीपीएस कंपनीकडून अंतिम करून घेतला जाणार आहे. मसुदा अंतिम झाल्यानंतर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com