
छत्रपती संभाजीनगर : सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (बी.ई., बी.टेक.) तसेच इंटिग्रेटेड एमई, एमटेक प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेरी-२ चे तात्पुरते जागा वाटप सोमवारी (ता. ११) जाहीर झाले. राज्यभरात १ लाख ६२ हजार २०५ उमेदवारांना जागा वाटप झाले असून २१ हजार ५५५ जणांना जागा वाटप झाले नाही. दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीला मंगळवारी (ता. १२) सुरवात झाली.