Beed News: विनाश नको, विकास हवा; महाकाय वडाचे पुनर्रोपण, रामनगरकरांनी दिला पर्यावरणाचा नवा ‘बीड पॅटर्न’!

Environmental conservation initiative by Ramnagarkars: रामनगरच्या ग्रामस्थांनी दिला निसर्ग संवर्धनाचा वस्तुपाठ; महाकाय वडाचे पुनर्रोपण करून पर्यावरणाचा नवा 'बीड पॅटर्न'!
Ramnagar’s Green Initiative Becomes Model ‘Beed Pattern’ for Sustainable Development

Ramnagar’s Green Initiative Becomes Model ‘Beed Pattern’ for Sustainable Development

Sakal

Updated on

बीड: जगभरात सध्या पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलाचे संकट उभे ठाकले असताना, विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड हा चिंतेचा विषय बनला आहे. रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधकामात निसर्गाचा बळी देणे ही जणू परंपराच झाली आहे; मात्र निसर्गाचे अस्तित्व टिकवणे हे मानवाच्या अस्तित्वासाठी किती अनिवार्य आहे, याचा वस्तुपाठ बीडमधील रामनगरच्या ग्रामस्थांनी घालून दिला आहे. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारे महाकाय वडाचे झाड तोडण्याऐवजी, त्याचे पुनर्रोपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन गावकऱ्यांनी निसर्गप्रेम केवळ शब्दांतून नाही, तर कृतीतून सिद्ध केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com