लातुरात बांबूपासून इथेनॉल निर्मिती, सहकार तत्त्वावर देशातील पहिली रिफायनरी

पालकमंत्री अमित देशमुख : पाच हजार एकरवर बांबू लागवड
Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basis
Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basissakal

लातूर : लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती देऊ शकेल अशा बांबूची या वर्षात पाच हजार एकरवर लागवड करणार असून येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर बांबूपासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता. एक) केली.

Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basis
अकोट : नागराज मंजुळेंच्या लघुपटात कैलास खडसान यांना संधी

लोदगा येथील देशातल्या पहिल्या बांबू टिश्यू कल्चर तयार करणाऱ्या अलमॅक बायोटेक लॅबच्या दुसऱ्या टप्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार आणि या प्रकल्पाचे प्रमुख पाशा पटेल, महाराष्ट्र बांबू बोर्ड, औरंगाबादचे संचालक पी. बी. भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ संजीव करपे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, अभिजित साळुंखे उपस्थित होते.

Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basis
वाड्यातील गारगावमध्ये पिकली स्ट्राॅबेरी ; शेतकऱ्यांना सहयोग संस्थेकडून मदत

महाराष्ट्राच्या कृषीचं भविष्य बदलवू शकणारा बांबूचा पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्ह्यात सुरू होत असल्याचा आनंद आहे. येत्या काळात शेतकरी फक्त अन्नदाता नव्हे तर ऊर्जा दाता बनणार असल्याच्या देशाचे रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाक्याचा अर्थ येत्या काळात सत्यात उतरू शकतो. त्यामुळे लातूर जिल्ह्यात या वर्षी पाच हजार एकरवर बांबू लागवड करून नजीकच्या काळात सहकार तत्त्वावर देशातली पाहिली रिफायनरी लातूरला उभी करू अशी घोषणा त्यांनी केली. श्री. पटेल ज्या पद्धतीने बांबू मिशनसाठी काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. हे मिशन वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basis
कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

तर देशात बांबूचा ब्रँड म्हणून पाशा पटेल यांची ओळख होत असून आपण त्यांच्या या शेतकरी हिताच्या कामाला मदत करु असे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले. लोदगा येथील अलमॅक बायोटेक लॅब देशात पहिली बांबूवरील टिश्यू कल्चर लॅबरोटरी आहे. आज घडीला एक तासात ५ हजार रोपटे तयार होतात. येत्या काळात या लॅबमधून १५० कोटी रोपे तयार करण्यात येतील आणि ती पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होतील, अशी माहिती श्री. पटेल यांनी दिली.

एअर कार्गोसाठी पाठपुरावा

आज जगभरातील सोयाबीनचे भाव लातूरमध्ये ठरतात हे अभिमानाची बाब आहे. ही सगळी किमया लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. येत्या काळात जिल्ह्यात कृषीमध्ये क्रांतिकारक बदल घडून येतील हे ओळखून आपण लातूर विमानतळावर एअर कार्गो, ड्राय इन लॅण्ड पोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे, त्याचा पाठपुरावा सुरु आहे, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com