esakal | बनावट विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, दोघे ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : बनावट विदेशी दारू बनवून विक्री करणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून कारवाईत दारु जप्त करण्यात आली.

बनावट विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, दोघे ताब्यात

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : बनावट विदेशी दारू बनवून (Fake Foreign Liquor) ती विक्री करणाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. यासह शनिवारी(ता.३१) चारचाकी वाहनातून हिच बनावट दारु विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना (Crime In Aurangabad) ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा बनावट दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना रविवारी (ता.एक) न्यालयालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यास गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड बायपासवरील हॉटेल अंबिका, आडगाव शिवारात एक वाहनाने (एमएच २० बीवाय १०७०) बनावट दारू घेऊन जाणाऱ्यास सापळा रचून पकडण्यात आले.(excise duty department raided on fake foreign liquor making factory, two arrested in aurangabad glp88)

हेही वाचा: उदगीर तालुक्यात जमिनीचा वाद गेला टोकाला, शेतकऱ्यावर गोळीबार

वाहनाची तपासणी केली असता, त्यात सहा लाख ८४ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासह प्रदीप सर्जेराव जायभाये (रा. क्रांतीनगर, गणेश चौक, मखमनाबाद रोड पंचवटी नाशिक, हल्ली मुक्काम डोणगाव, ता.अंबड, जि.जालना) व नामदेव एकनाथ घुगे (रा. टाका, ता.अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींच्या चौकशी केली असता, त्यांच्या घरी तपासणी करण्यात आली. यात बनावट दारू बनवणारे स्पिरिट, दारूच्या बॉटलला लावण्याकरिता लागणारे झाकणे, दारूमध्ये मिळवण्यासाठी लागणारे अर्क, विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटल्स असा एकूण १८ हजार १८० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यामुळे एकूण कारवाईत ७ लाख २ हजार ७३० रुपये किंमतीचे माल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत रंगला 'फॅशन शो', पाहा PHOTOS

दोन्ही आरोपीला रविवारी (ता.एक) ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही करावाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचाल उषा वर्मा, औरंगाबाद विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक एस.एल.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही.व्ही. रोकडे, निरीक्षक जावेद कुरेशी, स्टाफ निरीक्षक अरुणकुमार चव्हाण, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, जवान युवराज गुंजाळ, भास्कर काकड, रवींद्र मुरुडकर, मोतीलाल बहुरे, शेख निसार, धनंजय डीडुळ, शेरेक कादरी, संजय गायकवाड आदींनी ही कारवाई केली आहे.

loading image
go to top