
वैजापूर : तालुक्यातील एकोडी सागज गावातील अंगणवाडीत शुक्रवारी (ता.१८) पोषण आहाराच्या धान्याचा चक्क दोन ते चार वर्ष जुना सडका साठा आढळला. याबाबत ग्रामस्थांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.