
Fake Army Captain
sakal
दौलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) : मागील २४ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कॅप्टन असल्याचे सांगत पंचक्रोशीत वावरणाऱ्या आणि विविध संस्था-संघटनांकडून ‘महिला लष्करी अधिकारी’ म्हणून सन्मान मिळविलेल्या एका तोतया कॅप्टन महिलेला गुरुवारी (ता. ११) दौलताबादजवळच्या धरमपूर येथे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लष्कराच्या गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.