

Fake gold biscuits and seized valuables displayed by Latur police after busting the fraud racket.
Sakal
लातूर : बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करीत पाच जणांना अटक केली. यात ९ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव हा फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. \