धक्कादायक! कोरोना रुग्णाऐवजी उपचारासाठी 10 हजार रुपयांत बोगस रुग्णा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona hospital

सुरुवातीला फक्त खायचं आणि निवांत रहायचं असं सांगून आणलेल्या दोघांना जेव्हा इंजेक्शन आणि सलाईन लावण्यात येणार असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कोरोना रुग्णाऐवजी उपचारासाठी 10 हजार रुपयांत बोगस रुग्ण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेलेल रुग्ण पळून गेल्यानं बनावट रुग्ण कोविड सेंटरला दाखल कऱण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये एका आरोग्य अधिकाऱ्याने १० हजार रुपये देऊन खोटे रुग्ण दाखल केल्याचा प्रकार घडला आहे. तपासणी झालेले कोरोना रुग्ण पळून गेल्याने त्यांच्याऐवजी इतर दोघांना दहा दिवसांसाठी काम देतो असं सांगून आणण्यात आले. सुरुवातीला फक्त खायचं आणि निवांत रहायचं असं सांगून आणलेल्या दोघांना जेव्हा इंजेक्शन आणि सलाईन लावण्यात येणार असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घाबरलेल्या त्या दोन रुग्णांनी त्यांनना कसं आणलं गेलं आणि काय सांगितलं याची माहिती दिली. अद्याप याबाबत कोणती तक्रार करण्यात आलेली नसली तरी यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, दहा दिवसांचे दहा हजार देऊन कोविड सेंटरमध्ये बोगस रुग्ण म्हणून दाखल होण्याचं काम दिलं गेल्याचा आरोप दोघांनी केला आहे. औरंगाबादच्या चिखलठाणा इथल्या पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. दोघेजण कोरोना चाचणीसाठी आले होते. त्यातील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी कोविड सेंटरमध्ये न जाता इतर दोन तरुणांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. यााबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनीही माहिती दिली असून संबंधित रुग्णांना दहा हजार रुपयांचे आमिष दाखवण्यात आले. याबद्दल वरिष्ठांना माहिती देण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले.

हेही वाचा: कोरोनानंतर शिक्षण विभागाची पहिल्यांदाच आज महाबैठक!

बनावट रुग्ण म्हणून आलेल्याने सांगितलं की, आपल्याला एकाने काम लावतो म्हणत औरंगाबादला आणले. काय काम ते सांगितलं नाही, हातात महानगरपालिकेची पावती दिली. तसंच इथं दाखल व्हावं लागेल असं सांगितलं. त्यांनी कोविड वॉर्डला दाखल व्हावं लागेल हे सांगितलं नव्हतं. तुम्ही गोळ्या वगैरे काही खायचं आहे किंवा सलाइन लावायचं हे माहिती नव्हतं. जेव्हा सलाइन लावणार हे सांगितलं तेव्हा घरच्यांना कळवलं अशीही माहिती बनावट रुग्ण म्हणून दाखल झालेल्याने दिली.

तसंच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण म्हणतो की, आपल्याला साबळे सरांनी आपल्याला इथं आणले आणि कोणतीही अडचण येणार नाही असे सांगण्यात आले. एका व्यक्तीने याबाबत संपर्क करून दिला. १३ तारखेला त्यांना औरंगाबादला आणण्यात आल्याचंही दोघांनी सांगितले.

या प्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी महानगरपालिकेच्या फिर्यादीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण घरी राहून कोरोनावर उपचारासाठी इतर लोकांना पाठवलं जात होतं का असा प्रश्न निर्माण होतोय. तसंच अशा घटना यााधी घडल्या आहेत का याचाही तपास केला जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण उपचाराला दाखल करण्याचं रॅकेट तर नाही ना असं विचारलं जात आहे.

loading image
go to top