
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या १० वर्षांत कोणतीही जाहिरात नसताना, भरती प्रक्रिया नसताना चक्क कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ३१ जणांना शिपाई, चौकीदार व सफाई कामगार या पदांवर नियुक्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.