Fake Students: बनावट विद्यार्थी दाखवून सहा कोटी लाटले; छत्रपती संभाजीनगरात चार महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह १७ जणांवर गुन्हे
Education Fraud: छत्रपती संभाजीनगरमधील चार महाविद्यालयांनी बनावट आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर तब्बल ६ कोटींपेक्षा अधिक अनुदान उकळले. यामध्ये प्राचार्य, लिपिक, एजंट आणि बनावट लाभार्थ्यांचा समावेश असून १७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर: शहर परिसरातील चार महाविद्यालयांनी बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवत त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहा कोटी ५३ लाख १६ हजार ५० रुपये अनुदानावर डल्ला मारला.