ZP Teachers
Sakal
छत्रपती संभाजीनगर
Headmaster Transfer Issue : बदलीसाठी बोगसगिरी, नऊ गुरुजी घरी! जिल्हा परिषदेकडून निलंबनाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरप्रकारांना पहिल्यांदाच मोठा लगाम लावत जिल्हा परिषदेने तब्बल नऊ शिक्षकांना निलंबित केले.
छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरप्रकारांना पहिल्यांदाच मोठा लगाम लावत जिल्हा परिषदेने तब्बल नऊ शिक्षकांना निलंबित केले आहे.
बदलीसाठी खोटे दाखले, कृत्रिम परिस्थिती, बनावट कागदपत्रे आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दाखवले आहे. याबाबत आता सरसकट झाडाझडती घेतल्यास एकूणच ‘बदली माफिया’ उघड होतील.

