kidnapping
sakal
छत्रपती संभाजीनगर - पती-पत्नीतील वादात पतीने त्याच्या मित्रांच्या मदतीने शाळेच्या परिसरातून स्वतःच्याच अकरावर्षीय मुलाला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे बुधवारी (ता.२८) समोर आले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.