Crime News : धक्कादायक! 'त्या' पती-पत्नीची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

अलीकडील चार वर्षांपासून सततच्या अतिवृष्टीमुळे शेती नापीक
farmer family husband wife commit suicide due to debt crime police pachod
farmer family husband wife commit suicide due to debt crime police pachodsakal

पाचोड : शेतात रात्रीला पिकांस पाणी देण्यासाठी गेलेल्या सालवडगाव (ता.पैठण) येथील पती-पत्नीचे मंगळवारी (ता.१६) रात्री मृतदेह पडक्या विहिरीत आढळून आल्यानंतर उडालेल्या खळबळीवर अखेर पडदा पडला. संबंधित पती-पत्नीने कर्जबाजारीपणाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती बुधवारी (ता.१७) समोर आली आहे.

यासंबंधी माहिती अशी, सालवडगाव (ता. पैठण) येथील देविदास बाबूराव पाचे (वय ४०) व त्यांची पत्नी मीराबाई देविदास पाचे (३५) यांची सालवडगाव शिवारात गट क्रमांक ८१/१ मध्ये ६१ आर शेतजमीन असून त्यांनी चार वर्षांपूर्वी बॅंक ऑफ बडोदाच्या पैठण शाखेकडून ८४ हजार रुपये कर्ज घेतले होते.

सोबतच मुलीच्या विवाहासाठी खासगी सावकारांकडूनही कर्ज घेऊन लग्न उरकले. अलीकडील चार वर्षांपासून सततच्या अतिवृष्टीमुळे शेती नापीक झाली. दुसरी मुलगीही लग्नास आल्याने त्यांना या मुलीचे लग्न करण्याची व कर्ज फेडण्याची चिंता भेडसावू लागली. ते सोमवारी (ता.१५) रात्री विहिरीत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

farmer family husband wife commit suicide due to debt crime police pachod
Nashik Crime : पोलिस सध्या करताय तरी काय? भरदिवसा बॅग लिफ्टिंग, चैनस्नॅचिंग

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिस पाटील अशोक ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचोड पोलिसांना दिली. पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, सुधाकर मोहिते, प्रशांत नांदवे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कृष्णा आगळे रा. हर्षी व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री दहा वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीबाहेर काढून पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.

farmer family husband wife commit suicide due to debt crime police pachod
Chatrapti Sambhaji Nagar: अखेर जिल्ह्यांचही झालं नामांतर! 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशीव'चं निघालं नोटीफिकेशन

वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम साबळे यांनी तपासून मृत घोषित केले. बुधवारी (ता.१७) पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावांत जाऊन चौकशी केली, कुटुबीयांचे जबाब नोंदवले असता संबंधितानी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे समोर आल्याचे सपोनि श्री. माने यांनी सांगितले.

तर तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनीही त्यांचा तहसीलदारास अहवाल पाठवून ही आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून झाल्याचे नमूद केले. पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com