

Chhatrapati Sambhajinagar
esakal
लासूर स्टेशन: काळ्या आईची सेवा करत रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या कांद्याला केवळ शंभर रुपये प्रतिक्विंटलचा कवडीमोल भाव मिळाल्याने बुधवारी (ता. १३) एका शेतकऱ्याचा बांध फुटला. वाहतुकीचा आणि मजुरीचा खर्चही न निघाल्याने हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने कांदा मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ट्रॉलीभर कांदे फेकून दिले. एवढेच नाही, तर भरउन्हात त्याच कांद्यांच्या ढिगाऱ्यावर झोपून या बळीराजाने टाहो फोडला.