Kannad Flood: कन्नड तालुक्यात पावसाचा प्रकोप; गाडा नाल्याच्या पुलावरून जाताना शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला, शोधमोहीम सुरूच
Maharashtra Rain: कन्नड तालुक्यातील ब्राम्हणी–गराडा रोडवरील गाडा नाल्याच्या पुराच्या पाण्यात ५५ वर्षीय शेतकरी वाहून गेला. तहसील प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाचा शोधकार्य सुरू असून ग्रामस्थांनीही मदतकार्य हाती घेतले आहे.
कन्नड : तालुक्यातील ब्राम्हणी–गराडा रोडवरील गाडा नाल्याच्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना शनिवारी (ता. २७) रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली.