esakal | शेतकऱ्यांना मिळतोय पिवळ्या खजुराचा आधार, रोगमुक्त अन् पाणी कमी
sakal

बोलून बातमी शोधा

पिवळा खजूर

शेतकऱ्यांना मिळतोय पिवळ्या खजुराचा आधार, रोगमुक्त अन् पाणी कमी

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक शेतीच्या उत्पन्नात चढउतार येत राहतात, अशा परिस्थितीत सावरण्यासाठी आधार देणाऱ्या पिकांचा शोध घ्यावा लागणार आहे. गंगामाई कृषी उद्योगाने (Gangamai Agro Industry) याचे उदाहरण घालून दिले आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या, रोगाची बाधा न होणाऱ्या अन् खताची गरज भासणार नाही, अशा पिवळ्या खजुराची (Yellow Date) यशस्वी लागवड केली आहे. यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील (Farmers In Marathwada) शेतकऱ्यांसाठी खजुराच्या यशस्वी लागवडीने आधार देणारे नवीन पीक हाती लागले आहे. नवीन कृषी तंत्रज्ञान, नवीन पिक पद्धती, आंतरपिक पद्धतीचा अवलंब, पाण्याची बँक व काटकसरीने वापर, लागवड ते विक्री व्यवस्थापन करून शेती उद्योग यशस्वी करण्याचे काम गंगामाई कृषी उद्योग करीत आहे. खूप ऊन आणि पावसाची कमतरता असणाऱ्या प्रदेशात येणारे खजूर पिक. या पिकाची औरंगाबादमध्ये (Aurangabad) यशस्वी लागवड करून इथल्या शेतकऱ्यांना नव्या पिकाचा पर्याय दिला आहे.(farmers cultivate yellow date in marathwada aurangabad news glp88)

हेही वाचा: दारु पिऊन तर्राट झालेल्या तरुणीने घातला बसस्थानकात धिंगाणा

गंगामाई कृषी उद्योगाचे चेअरमन पद्माकरराव मुळे यांच्या कल्पकतेतून आणि पाठबळामुळेच शेतीत नवनवीन प्रयोग करत असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खजुराचीही यशस्वी लागवड करू शकल्याचे सांगुन येथील शास्त्रज्ञ सुरेंद्र देशमुख म्हणाले, की आपल्याकडे हल्ली ४३ अंशांपर्यंत तापमान जात असल्याने खजूर लागवडीसाठी पुरक वातावरण होत आहे. गंगामाई कृषी उद्योगाने २०१८ मध्ये पाण्याचा निचरा होणाऱ्या ११ एकरमध्ये कच्छमधून ३१०० रुपये प्रति रोप दराने आणून २५ बाय २५ अंतरावर लागवड केली. प्रति झाड २० ते ३० किलो शेणखत आणि जमिनीच्या धारण क्षमतेनुसार ठिबकद्वारे गरजेपुरते पाणी दिले. यंदा प्रती झाड ७ ते २५ किलो खजूर लगडले आहेत. यंदाचे पहिलेच उत्पन्न असून नऊ टन उत्पादन झाले आहे. एकरी २ लाख ७५ हजार रुपये खर्च आला. लागवड खर्च एकदाच करावा लागतो. पुढे किमान ३० ते ४० वर्षे एकरी किमान तीन लाख रुपये हमखास उत्पन्न मिळू शकते. यात आंतरपिक म्हणून मोसंबी लावली आहे. त्यामुळे दोन पिकातून उत्पादनाचा स्रोत वाढवण्यास मदत झाली. शेतकऱ्यांनी एकरभर तरी पिवळ्या खजुराची लागवड करावी किंवा तसे शक्य होत नसेल तर किमान बांधाने जरी झाडे लावले तरी पुरक उत्पन्न मिळू शकेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कमर्शियल शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Corona : नांदेडमध्ये सध्या कोरोनाच्या ५० रुग्णांवर उपचार सुरु

सेंद्रिय शेतीला प्राधान्य

खजूर शेती पिकवण्यासाठी नर व मादीची लागवड करून परागीकरण करणे अनिवार्य आहे. तरच खजुराचे भरघोस उत्पादन मिळते. ११ एकरावर पिवळ्या खजुराची झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे, सेंद्रिय शेती, समतोल खतांचा वापरास महत्त्व देऊन रसायनमुक्त फळांचे उत्पादन घेतले जाते. सोलारद्वारे नैसर्गिक ऊर्जा निर्मिती व वापरास प्राधान्य दिले जाते. वीज संकटावर मात करून वेळेत पिकांना पाणी देण्यासाठी सौर ऊर्जा संजीवनी देणारी ठरत आहे. सहा कोटी लिटरपेक्षा अधिक साठवणक्षमता असलेले शेततळे शासनाचे कोणतेही अनुदान न घेता तयार केले. पावसाळ्यात सहा कोटी लिटर पेक्षा अधिक पाणीसाठा होतो. याच वॉटर बँकेतून गरजेनुसार ठिबकद्वारे पिकांना पाणी दिले जाते.

हेही वाचा: औरंगाबादच्या स्मार्ट सिटी बसची देशपातळीवर दखल

बहुगुणी खजुराला कायम मागणी

० ओल्या खजुराला खूप चांगला भाव मिळू शकतो.

० नैसर्गिक आपत्तीत हे पिक शेतकऱ्यांना सावरू शकते.

० एक झाड देते १२०० ते १५०० रूपये उत्पन्न

० एका एकरात बसतात ५९ झाडे

० खजूर खाल्याने मेंदू, हृदय, हाडांना बळ मिळते. अॅनेमिया, त्वचा

आणि केस, वंध्यत्व, रक्तदाब कमी करणे, हाडांच्या आरोग्यासाठी, प्रसूती,

जास्तीत जास्त पोषणमुल्य असल्याने आहारात त्याचा सर्वत्र वापर केला जातो.

० अ, ब, क जीवनस्तवे आणि लोह, फायबर, अँटिऑक्सिडंट्स भरपूर.

खजुरालाच सुकवून खारीक तर प्रक्रिया करून पेंडखजूर केली जाते.

loading image
go to top