esakal | Corona : नांदेडमध्ये सध्या कोरोनाच्या ५० रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

corona image.jpg

Corona : नांदेडमध्ये सध्या कोरोनाच्या ५० रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात (Corona Cases In Nanded) गुरुवारी (ता.२९) एक हजार ५९५ अहवाल प्राप्त झाले. त्यामधील पाच अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. दिवसभरात चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या ५० रुग्ण उपचार घेत असून यात दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार १७२ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४६७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका (Nanded Municipal Corporation) क्षेत्रात दोन, मुखेड तालुक्यात एक, हिंगोली (Hingoli) एक, तर हदगाव (Hadgaon) तालुक्यांतर्गत एक असे एकूण पाच बाधित आढळले. गुरुवार चार बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. त्यात मुखेड कोविड रुग्णालयातील - एक, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील - तीन अशा एकुण चार व्यक्तींचा समावेश आहे.(now 50 corona patients being treatment in nanded glp88)

हेही वाचा: गावी निघालेल्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

नांदेड कोरोना मीटर

एकुण बाधित - ९० हजार १७२

एकूण बरे - ८७ हजार ४६७

एकुण मृत्यू - दोन हजार ६५५

गुरुवारी बाधित - पाच

गुरुवारी बरे - चार

गुरुवारी मृत्यू - शून्य

उपचार सुरु - ५०

अतिगंभीर प्रकृती - दोन

loading image
go to top