
सोयगाव : तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगामात १० डिसेंबरपर्यंत ७ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाल्याचा तालुका कृषी कार्यालयाचा अहवाल आहे. मात्र, या अहवालात तेलबियांत समावेश असलेल्या सूर्यफुल, तीळ आणि करडईचा पेरा अगदी नाममात्र असल्याची बाब समोर आली आहे.