

Late-Night Walk Home Turns Fatal as Speeding Car Hits Two
Sakal
हर्सूल: लग्न समारंभात केटरिंगचे काम आटोपल्यानंतर रात्री उशिरा पायी परतणाऱ्या तरुणांना भरधाव कारने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसऱ्या जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (ता. नऊ) जुन्या जकात नाक्याजवळ घडली. अनिकेत दिलीप निंबाळकर (वय २३, रा. न्यू पहाडसिंगपुरा, मूळ रा. लांजूळ, ता. खामगाव, जि. बुलडाणा) असे मृताचे नाव आहे.