esakal | कोरोनाची धास्ती...पुणे, नाशिक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी महापौरांच्या दालनात पुन्हा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

कोरोनाची धास्ती...पुणे, नाशिक, शिर्डीच्या पर्यटकांवर विशेष लक्ष

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज केली असून, गुरुवारी (ता. पाच) महापौरांच्या दालनात पुन्हा एकदा तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुणे, नाशिक, शिर्डीहून शहरात येणाऱ्या पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळामार्फत कोरोनाबाबत कशी काळजी घ्यायची, यासाठी प्रवाशांचे जनजागरणदेखील केले जाणार आहे. 

महापालिकेची यंत्रणा सज्ज
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्राला धोका असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे महापालिकेनेही यंत्रणा सज्ज केली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आर. एम. बजाज, एसटी महामंडळाचे विभाग अधिकारी चंदनशिवे, पी. ई. देवकाते, हॉटेल असोसिएशनचे अनिरुद्ध रैथवन, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अर्चना राणे यांची उपस्थिती होती. 

बसस्थानकावर मदत केंद्र सुरू 
बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले, की २४ तास कंट्रोल रूम तयार करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता. शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. देशी-विदेशी पर्यटक येतात. त्यानुसार गुरुवारी आढावा घेण्यात आला. एसटी महामंडळामार्फत पुणे, नाशिक, शिर्डी येथून येणारे प्रवासी व पर्यटकांवर लक्ष ठेवावे, असा निर्णय झाला. मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाने शहरात मास्कचा तुटवडा जाणवणार नाही, जादा किमतीमध्ये त्याची विक्री होणार नाही, याची दखल घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

हॉटेल व्यवसाय ठप्प, प्रवासीही घटले 
कोरोना व्हायरसचा परिणाम शहरातील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. अनेक जण हॉटेलच्या बुकिंग रद्द करत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. २५ ते ३० टक्के ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एसटीचे प्रवासीदेखील घटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

आरोग्यमंत्र्यांचे सहकार्याचे आश्‍वासन 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे महापौरांनी सांगितले. महापौरांनी यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार मंत्री टोपे यांनी तातडीने लागणारी मदत केली जाईल, असे सांगितले. 
 

loading image