esakal | औरंगाबादेत कोरोनाचा पाचवा बळी, आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय जेष्ठाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

औरंगाबाद शहरात कोरोनाचा पाचवा बळी गेला असून एका 60 वर्षीय नागरिकाचा बुधवारी (ता. 22) पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती घाटीतील डेडिकेटेड कोवीड -19 रुग्णालय प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. 

औरंगाबादेत कोरोनाचा पाचवा बळी, आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय जेष्ठाचा मृत्यू 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाचा पाचवा बळी गेला असून एका 60 वर्षीय नागरिकाचा बुधवारी (ता. 22) पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती घाटीतील डेडिकेटेड कोवीड -19 रुग्णालय प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. 

भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा काल 21 एप्रिलला मृत्यू झाला. त्यानंतर चोवीस तासातील हा औरंगाबादेतील दुसरा मृत्यू आहे. 

आरेफ कॉलनीतील साठ वर्षीय जेष्ठ नागरिकाला 19 एप्रिलला सकाळी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. अंगदुखी, तीव्र ताप, डोकेदुखी आणि दम लागत असल्यामुळे त्यांना कोवीड -19 चा संशयित म्हणून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

या रुग्णावर घाटीत  उपचार सुरू होते

दोन्ही बाजूच्या न्यूमोनिया बरोबरच रक्तातील कोऍग्युलोप्याथी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. इतर सर्व औषध उपचार नियमावलीप्रमाणे सुरू होती. बायलॅटरल न्यूमोनीया विथ एक्यूट रेस्पिरेट्री डिस्ट्रेस सिंड्रोम कोव्हिड 19 असोसिऐटेड कोऍग्युलोप्याथी या आजाराने त्यांचा मृत्यू झाला आहे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

आतापर्यंत कोरोनाने झालेले मृत्यू

  • 5 एप्रिल सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक  व्यवस्थापकाचा मृत्यू 
  • 4 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू. 
  • 8 एप्रिलला बिस्मिला कॉलनीतील  65 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • 21 एप्रिलला भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू. 
  • 22 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू. 
loading image