esakal | कॉल गर्ल म्हणत महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर केला व्हायरल; गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

call girl
कॉल गर्ल म्हणत महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर केला व्हायरल; गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कॉल गर्ल म्हणून एका महिलेचे छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक दुसऱ्यांना पाठवून महिलेची बदनामी करणाऱ्यांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश वाखरे आणि एक अज्ञात संशयित मोबाईलधारक अशा दोघांविरोधात महिलेने पोलिसांत धाव घेतली होती. महिलेच्या फिर्यादीनुसार मंगेश वखरे नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या एकास व्हॉट्सॲपवर संबंधित महिलेचे छायाचित्र आणि तिचा मोबाईल क्रमांक पाठविला. दरम्यान, दुसऱ्या संशयित मोबाइलधारकाने महिलेस फोन करून तिला लज्जास्पद बोलला.

हेही वाचा: आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!

तसेच वखरे याने मोबाईल नंबर दिल्याचे सांगितले. वखरे याने सोशल मीडियावर संबंधित महिलेचे छायाचित्र कॉल गर्ल म्हणून व्हायरल केला. त्यानंतर संबंधित महिलेला खूप अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने मनस्ताप झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दिवटे करत आहेत.