सर्वात पहिले निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा : बच्चू कडू

बंद करायचे असेल तर मंदिर, मशिद, सगळी धार्मिकस्थळे...
Bacchu-Kadu
Bacchu-KaduTeam eSakal

मुंबई : राज्यात भोंग्यावरुन राजकारण तापल्याचे दिसत आहे. महागाई, बेरोजगारी यासह इतर अत्यावश्यक सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी क्षुल्लक मुद्दे पुढे करुन वास्तवापासून लांब नेले जात असल्याचा आरोप होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भोंग्याच्या राजकारणावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे, असा सल्ला कडू यांनी अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे. (Bacchu Kadu Say, First Let Shut Election Rally Loudspeakers)

Bacchu-Kadu
टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर; म्हणाले...

बंद करायचे असेल तर मंदिर, मशिद, सगळी धार्मिकस्थळे व सर्वात पहिले निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मशिदींवरील भोंगे काढल्यास विरोध करणार असा इशारा दिला आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यावर मनसे ठाम आहे. ३ मे ही त्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे.

Bacchu-Kadu
चीनच्या शांघाय शहरात कोरोनामुळे स्थिती चिंताजनक, कडक निर्बंध सुरुच

दुसरीकडे औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा सभा होणार आहे. या सभेवरही महाविकास आघाडीमधील पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोरंजनासाठी जा असा सल्ला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com