फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्याने चक्‍क कर्जदाराचे डोके फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल राठोड

फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्याने चक्‍क कर्जदाराचे डोके फोडले

कन्नड - बजाज फायनान्स कंपनीकडून दुचाकीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही, म्हणून कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदारास चाळीसगाव रस्त्यावरील कार्यालयात (ता.१८) बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता.१८) दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी कन्नड शहर ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कर्जदार राहुल बसराज राठोड (वय २४, रा. हिवरखेडा गौताळा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहुल राठोड (वय २४ ) याने १९ फेब्रुवारी २०१९ मध्ये बजाज फायन्स कंपनीकडून कडून ९०००० रुपये कर्ज घेतले होते. त्याचा प्रति महिना हफ्ता ५८३४ रुपये असून याप्रमाणे आतापर्यंत सदर तरुण हफ्ता भरत आला आहे.

मात्र, चालू महिन्यात हफ्ता भरण्यास विलंब झाला. यानंतर सोमवारी त्यास बजाज फायनान्सच्या चाळीसगाव रोडवरील कार्यालयात बोलावून घेतले. राहुल व त्याचा नातेवाईक सतीश जाधव हे दोघे कार्यालयात आले असता दोन कर्मचाऱ्यांनी (नाव माहीत नाही) राहुलला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच दुसऱ्या इसमाने लाथा बुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याचा धमकी दिली. यावेळी सतीश जाधव यांनी व इतर जमलेल्या लोकांनी राहुल यास बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर राहुल राठोड यांच्या फिर्यादी वरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात दोन इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुंकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल आर. बी. भुसारे हे करीत आहेत. जखमीवर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Finance Recovery Employe Head Banging The Borrower

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top