Raj Thackeray | राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल, गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल

Raj Thackeray booked in Aurangabad

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा: सभेत काय काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर व्यक्त झाले राज ठाकरे? जाणून घ्या

सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये. धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी यासह पोलीस आयुक्तांनी १६ अटी शर्तीनुसार राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी दिली होती, मात्र ठाकरेंनी दोन समाजात बाधा निर्माण होईल असे वक्तव्य केले. चिथावणी देणारे भाषण केले यासह अनेक अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्या फिर्यादीवरून राज ठाकरे यांच्यासह राजीव जेवलीकर आणि।इतर संयोजक यांच्याविरोधात कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करत आहेत. (Loudspeaker Row)

ठाकरेंचे ४५ मिनिटांचे भाषण पोलिसांनी ऐकले ५ तास

राज यांची सभा झाल्यानंतर या सभेचा अहवाल गृह मंत्रालयाने मागविला होता. सभेसाठी परवानगी देताना घालून दिलेल्या १६ अटी शर्तींचे उल्लंघन झाले की नाही हे तपासण्यासाठी पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते यांनी सायबर शाखेत पाच तास बसून राज ठाकरे यांचे ४५ मिनिटांचे भाषण ऐकले. त्यानंतर अहवाल बनविण्याचे काम सुरु झाले होते. (FIR filed against Raj Thackeray)

हेही वाचा: राज ठाकरेंना अटक होऊ शकते का?, वाचा कायदा काय सांगतो

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहे. भाजपाने यावरुन ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवलीये. तर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिलाय.

(Inputs From Sushen Jadhav)

Web Title: Fir Registered Against Raj Thackeray Over Hate Speech In Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
go to top