राज ठाकरेंना अटक होऊ शकते का?, वाचा कायदा काय सांगतो

औरंगाबादच्या सभेमध्येदेखील राज यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत ठाम असल्याचे म्हटले होते.
Raj Thackeray Sabha Updates | Loudspeaker Row
Raj Thackeray Sabha Updates | Loudspeaker RowSakal

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर 1 मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडलेल्या जाहीर सभा पार पडली होती. या सभेमध्येदेखील राज यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सभेसाठी दिलेल्या अटी-शर्थींपैकी काहींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर लावण्यात आलेली बहुतेक कलमं ही अजामीनपात्र असून, यामध्ये जामीन देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, पोलिसांना नाही. पोलीस नोटीस देऊ शकतात, हजर राहण्यास सांगू शकतात, किंवा आदेशांचं पालन न केल्यास अटकही होऊ शकते. दरम्यान, राज ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये राज ठाकरे यांना अटक होऊ शकते का? याबाबत कायदा काय सांगतो हे आपण पाहणार आहोत. (Loudspeaker Controversy)

Raj Thackeray Sabha Updates | Loudspeaker Row
...अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचं दुर्दैव; राणेंचं पवारांवर टिकास्त्र

राज ठाकरे यांच्याविरोधात कलम 116, 117 तसेच महाराष्ट्र पोलीस अॅक्ट 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय 153 अ कलमानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असेदेखील सांगितले जात असून, यातही ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद आहे. दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन करणे यानुसार ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. (Raj Thackeray Aurangabad Rally)

Raj Thackeray Sabha Updates | Loudspeaker Row
राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल, गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होणार?

कलम १५३ अ

धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भावना राखण्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्मिती करणे तसेच वरील अन्य कोणत्याही कारणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कृत्ये करणे.

शिक्षेची तरतुद : तीन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. उपासन करण्याच्या ठिकाणी केलेला गुन्हा, तसेच कलम (1) मध्ये नमूद केलेला गुन्हा कोणीही उपासनेच्या ठिकाणी किंवा धार्मिक उपासना किंवा धार्मिक समारंभ पार पाडण्यात गुंतलेल्या कोणत्याही संमेलनात अशा प्रकारचे कृत्य अथवा भाषण केल्यास तुरुंगवासाची शिक्षा होईल. जे पाच वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दंडासही जबाबदार असेल.संबंधित गुन्हा अजामीनपात्र आहे.

कलम 116

गुन्हा करण्यासाठी मदत

कलम 117

गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण देणे यासाठी हे कलम असून, हा नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र गुन्हा आहे. या कलमाअंतर्गत आधी तपास होईल आणि त्यानंतर अटक करण्यात येऊ शकते.

Raj Thackeray Sabha Updates | Loudspeaker Row
'दादा, हाच नियम शिवसैनिक अन्...', चित्रा वाघ यांचा अजित पवारांना सवाल

सांगली प्रकरणात ठाकरेंना वॉरंट

२००८ साली राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी काही भडकाऊ वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं. (Raj Thackeray Hanuman Chalisa Row)राज ठाकरे यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचाही आरोप झाला. यावेळी सांगलीच्या शिराळ्यात मनसेच्या कार्यतर्त्यांनीही आंदोलन केलं होतं. या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख होता. (Raj Thackeray News)

महिनाभरापूर्वी शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र महिनाभरापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या केसेस निकाली काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार ही प्रकऱणं आतापर्यंत मार्गी लागणं आवश्यक होतं. मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने कोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. त्याआधीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com