
औरंगाबाद: विवाहितेला दोरीने बांधून चोरांनी भरदिवसा घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना भावसिंगपुरा भागातील निसर्ग कॉलनीत ३० जुलैरोजी दुपारी घडली.
निर्सग कॉलनीमध्ये निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा व सून राहतात. घटनेच्या दिवशी दुपारी निता दत्तू आहेरकर (३०, रा. संविधान चौक, निसर्ग कॉलनी) या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीवरुन दोन जण मास्क घालून आत शिरले.
त्यानंतर दोघांनी निता यांच्या तोंडाला रुमाल लावून बेशुध्द केले. निता बेशुध्द झाल्यानंतर त्यांचे दोरीने हातपाय बांधून कपाटातील एक तोळ्याचे नेकलेस व सहा हजारांची रोकड लंपास केली. दुपारी साडेतीनच्या सुमारास निता या शुध्दीवर आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला.
त्यानंतर घटनेची माहिती त्यांनी पती दत्तू आहेरकर यांना दिली. त्यावरुन दोघांनी छावणी पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, ३१ जुलै रोजी या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अंबादास मोरे करत आहेत.
प्लॉटच्या वादातून वकीलावर हल्ला
औरंगाबाद : प्लॉटवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यास मज्जाव केल्यावरून सात ते आठ जणांनी वकीलाला बेदम मारहाण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना ३० जुलैरोजी हर्सूल परिसरातील कोलठाणवाडी रोडवर घडली. अॅड. शेख नासेर अब्दुल वाहेद पटेल (वय ३९, रा.करीमनगर, कोलठाणवाडी रोड, हर्सूल परिसर) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वकीलाचे नाव आहे.
अॅड. शेख नासेर यांच्या आजोबाच्या नावाने हर्सूल गावातील जामा मस्जिदजवळ २० बाय २५ फुटांचा प्लॉट आहे. सदरील प्लॉटवर शेख युनूस शेख सिकंदर पटेल यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर अॅड. शेख नासेर पटेल यांनी मज्जाव केला होता. त्यावेळी शेख जाकेर शेख सिकंदर पटेल, शेख युनूस शेख सिकंदर पटेल, गफार पटेल, शेख सुलतान शेख युनूस पटेल
शेख सद्दाम शेख युनूस पटेल, शेख अराफत फजल पटेल, शेख सरदार शेख युनूस, नदीम नाजी पठाण, सर्व रा.हर्सूल गाव यांनी अॅड. शेख नासेर पटेल यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या कारच्या काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी अॅड. शेख नासेर पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या आठ जणांविरूध्द हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.