

Chhatrapati Sambhaijanagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: दिल्लीतील एका हॉटेलला आग लागून २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत महापालिकेने शहरातील गर्दीचे ठिकाणे म्हणजेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, लॉज, क्लासेस, मॉल्स, तसेच वर्दळीच्या आस्थापनांनी अग्निशमन परवाना घेऊन सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून, १७४ हॉटेल्सकडे वैध अग्निशमन परवाने नसल्याने कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.