देखभाल दुरुस्तीचा फसवा खेळ!

वैजापुरात पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे
Power cut
Power cutSakal

वैजापूर - शहराला महावितरणने पुरते हैराण करून सोडले आहे. अकार्यक्षम आणि जुनाट यंत्रणेमुळे शहरातील बत्ती गूल होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. रात्री-अपरात्री पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांच्या संतापाचा पारा चढत आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागातील रात्रभर बत्ती गूल झाल्याने महावितरणने मॉन्सूनपूर्वी लाखो रुपये खर्च केलेल्या देखभाल दुरुस्तीचा फसवा खेळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील काही दिवसांपासून महावितरणने नागरिकांच्या नाकीनऊ आणले आहेत. छोट्या-मोठ्या कारणावरून वारंवार तासन्तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत. त्यात वीज देयकांचा फुगीर आकार, ग्राहकांच्या खिशाला बसत असलेली कात्री आणि देयकांची जबरदस्तीने होणारी वसुली यामुळे या विभागाच्या मुजोर कारभाराला जनता वैतागली आहे. नव्या सुविधा निर्माण न करता जुन्याच यंत्रणेवर आपला कारभार चालविला जात आहे. यामुळे वाढते ग्राहक आणि महावितरण यांच्यात संघर्ष शहरात वाढत चालला आहे.

मान्सूनमध्ये वीज ग्राहकांना अखंडित वीज मिळावी यासाठी महावितरणच्या वतीने दर शुक्रवारी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. इतरही दिवशी एक ते दोन तास वीज बंद ठेवून ही कामे केली जातात. मात्र, त्यानंतरही वाऱ्याची मोठी झुळुक आली किंवा पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तरी निम्म्या शहरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने देखभाल दुरुस्तीचा फसवा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे.

भूमिगत वीज व्यवस्थेचे स्वप्नच

शहरात काही वर्षांपासून येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरण व्यवस्था कोलमडली जात आहे. मागील वर्षी आलेल्या मुसळधार पावसाने अनेकदा संपूर्ण शहर अंधारात जाते. अनेक वर्षांपासून भूमिगत वीजवाहक यंत्रणेची मागणी केली जात आहे. पण केवळ महावितरण व्यवस्थेकडून शासनाला वेगवेगळे प्रस्ताव सातत्याने पाठवले जातात आणि शासनाकडून या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com