esakal | कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे ‘ते’ विद्यार्थी नापासच! निकालात गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

BAMU News

आमच्या संस्थेतील या विषयात काल जे विद्यार्थी नापास दाखवत होते. त्यांचे निकाल आज नव्याने लागले आहेत. आणि ते कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (आयटी) या विषयात पास झाले आहेत. निकाल बदललेले प्रमाण ९० टक्केपेक्षा अधिक आहे, असे एका संस्थाचालकांनी सांगितले.

कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे ‘ते’ विद्यार्थी नापासच! निकालात गोंधळ

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील Babasaheb Ambedkar Marathwada University ‘बी. कॉम.’च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना निकालाने धक्काच बसला आहे. इतर विषयात चांगले गुण घेतलेले विद्यार्थी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (आयटी) Computer Application विषयात मात्र सपशेल नापास झाले. याबाबत ‘जो निकाल आहे, तो योग्यच आहे,’असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. बी. कॉम. ची B.Com Examination परीक्षा १० मे १७ मेदरम्यान झाली. या परीक्षेचा निकाल नऊ जूनला लागला. त्यानंतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (आयटी) विषयात बहुतांश विद्यार्थी नापास झाल्याचे कळाले. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थी संघटना Student Union आणि विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठात Aurangabad जात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार जे विद्यार्थी आधी नापास दाखवत होते. त्यांचा निकाल मंगळवारी (ता. १५) पास झाल्याचा मिळत आहे. मात्र, या विषयात नापास विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे डॉ. पाटील यांनीही मान्य केले आहे. या विषयाची किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, यातील पास आणि नापास संख्या किती याची अद्याप आकडेवारी स्पष्ट नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे याविषयीचा गोंधळ अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. दोन दिवसांत यावर तोडगा काढावा, अन्यथा नापास झालेले सरसकट पास करण्यात यावे, याबाबत सोमवारी (ता. १४) परीक्षा नियंत्रकांना भेटलो. निवेदनाची दखल घेत २४ तासांच्या आत विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे, असे विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) जिल्हाध्यक्ष मोहित जाधव यांनी कळविले.First Year Student Of Computer Application Course Failed

हेही वाचा: एका पुस्तकाची दुसरी गोष्ट

विद्यार्थ्यांचे निकाल बदलताहेत!

आमच्या संस्थेतील या विषयात काल जे विद्यार्थी नापास दाखवत होते. त्यांचे निकाल आज नव्याने लागले आहेत. आणि ते कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (आयटी) या विषयात पास झाले आहेत. निकाल बदललेले प्रमाण ९० टक्केपेक्षा अधिक आहे, असे एका संस्थाचालकांनी सांगितले. तर, डॉ. योगेश पाटील मात्र, निकालात कुठलेही बदल नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. विद्यार्थी पास होत असताना डॉ. पाटील हे निकाल बदलला नसल्याचे सांगत असल्याने अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे.

निकाल बरोबर आहे. विद्यार्थी संख्या जास्त नापास आहे, एवढेच आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आम्हीही तपासले. पेपर, की आणि निकालही बरोबर आहे. सध्यातरी निकाल तोच राहील.

- डॉ. योगेश पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ

loading image