औरंगाबाद : साडेपाच हजार प्रवाशांचा १२३ बसमधून प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus trips increased Aurangabad Pune route 17 Shivshahi started

औरंगाबाद : साडेपाच हजार प्रवाशांचा १२३ बसमधून प्रवास

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर औरंगाबाद विभागात(aurnagabad bus depo) आतापर्यंत ९०० कर्मचारी रुजू झालेले आहेत. त्यामुळेच लालपरीची वाहतूक(msrtc transport ) काही प्रमाणात पूर्ववत होत आहे. रविवारी (ता. नऊ) विभागातून १२३ लालपरी धावल्या. या बसेसनी ४०८ फेऱ्या केल्या. यामुळे ५ हजार ६२८ जणांनी प्रवास केला.

हेही वाचा: औरंगाबाद : नववर्षात पर्यावरणाचे भान...उभारले जैवविविधता उद्यान!

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच असल्याने प्रवासी सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे. असे असले तरीही काही प्रमाणात सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने एसटीने रविवारी सिडको बसस्थानक (आगार क्र १) मधून जालना, बीड, गेवराई मर्दा, तुळजापूर, लातूर, पुणे, उस्मानाबाद आणि अंबाजोगाई या मार्गावर २६ बस चालवून ६४ फेऱ्या केल्या. मध्यवर्ती बसस्थानकातून (आगार क्र. २) २४ शिवशाही बसच्या नाशिक व पुणे मार्गावर २६ फेऱ्या करण्यात आल्या, तर पुणे, नाशिक, कन्नड, बुलडाणा, नगर, पैठण, वैजापूर या मार्गावर ३८ बसने ६९ फेऱ्या करण्यात आल्या. पैठण आगाराने औरंगाबाद, जालना, शहागड, पुणे, शेवगाव, अंबड आणि सिल्लोड मार्गावर १४ लालपरी चालवत ४९ फेऱ्या केल्या आहेत. सिल्लोड आगारातून औरंगाबाद, भोकरदन, कन्नड मार्गावर चार लालपरी चालवत १० फेऱ्या केल्या.

वैजापूर आगारातून औरंगाबाद, कोपरगाव, गंगापूर, श्रीरामपूर, कन्नड आणि नाशिक मार्गावर चार बसने १४ फेऱ्या केल्या. कन्नड आगारातून औरंगाबाद, वडनेर, लासूर, पिशोर, सिल्लोड, चिकलठाण, चिंचोली, भारंबा, वैजापूर, फुलंब्री, गंगापूर, जेऊर, कन्नड, सेमी गेवराई आणि गजागाव/आडगाव मार्गावर २६ बसने ७४ फेऱ्या केल्या. तर सोयगाव आगारातून अजिंठा लेणीसाठी दोन शिवशाही, पाच हिरकणी बस चालवण्यात आल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top