esakal | चिंताजनक: औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, २४ तासात दोन मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

कोरोनामुळे शहरातील रामनगर, मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. हा कोरोनाचा शहरातील चौदावा बळी आहे.

चिंताजनक: औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, २४ तासात दोन मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुळे शहरातील रामनगर, मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. हा कोरोनाचा शहरातील चौदावा बळी आहे. रामनगर येथील त्या रुग्णाला ताप खोकला व दम लागत होता.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यासाठी त्यांना आठ मे रोजी दुपारी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यांची कोविड -१९ विषाणूसंबंधित चाचणी नऊ मे रोजी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले.

जास्त दम लागत असल्यामुळे व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्यामुळे त्यांना १० मे रोजी दुपारपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जास्त वय आणि  त्यांना बायलॅटरल न्यूमोनाईटीस विथ अक्युट रेस्पेरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम झाल्यामुळे त्यांचा रविवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. अशी माहिती माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत झालेले १३ मृत्यू..

५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू
१४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
१८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
२१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
२२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू.
२७ एप्रिलला किलेअर्क येथील ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू
२८ एप्रिलला किलेअर्क येथील ७७ वर्षीय  महिलेचा मृत्यू
१ मे  गुरुदत्तनगर, गारखेडा येथील ४७ वर्षीय  वाहनचालकाचा मृत्यू.
२ मे नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
३ मे देवळाई येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
५ मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू.
७ मे आसेफिया कॉलनीतील ९५ वर्षीय महिलेचा मृत्यू.
१० मे रोशनगेट येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image