
छत्रपती संभाजीनगर : शेती करून उपजीविका भागवणारा सातारा जिल्ह्यातील तरुण लग्नासाठी शहरात आला. त्यासाठी त्याने पावणेदोन लाख रुपये देखील मोजले. लग्न झाल्याने समाधानी होऊन परत आपल्या गावाकडे परतत असताना छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाहेर पडताच कार आडवी लावून तरुणाच्या कारची तोडफोड करण्यात आली.