Vaccination
Vaccination

औरंगाबादेत कारमध्येच लसीकरण, सोमवारपासून होणार सुरुवात

Summary

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला काही दिवसांपासून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे.

औरंगाबाद : कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून महापालिकेने देखील ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण मोहीम (Drive In Corona Vaccination In Aurangabad) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कारमधून येणाऱ्या नागरिकांना वाहनाखाली उतरण्याची गरज नाही. त्यांना कारमध्येच लस मिळेल. ही मोहीम सोमवारपासून (ता. सात) प्रोझोन मॉलच्या (Prozon Mall) पार्किंगमध्ये राबविली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला काही दिवसांपासून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे. पण सुमारे तीन लाख नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे लसीकरणाची गती वाढावी यासाठी महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) मुंबई, पुण्यापाठोपाठ ‘ड्राइव्ह इन’ मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Site) ताटकळत थांबण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी ड्राईव्ह इन ही संकल्पना राबविण्याची सूचना केली. त्यानुसार आरोग्य विभागाने कारमधून या, लस घेऊन जा या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. ही ड्राईव्ह इन ही मोहीम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. कारसह इतर चारचाकी वाहनामधून तसेच रिक्षामधून आलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.(From Monday Drive-In Corona Vaccination Starts In Aurangabad)

Vaccination
'मेटेंच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांकडून रसद'
कोरोना
कोरोनाई सकाळ

पार्किंगमध्येच थांबण्याची व्यवस्था

लस दिलेल्या प्रत्येकाला अर्धा तास देखरेखीखाली ठेवले जाते. त्यामुळे एपीआय कॉर्नर जवळील प्रोझोन मॉलच्या दोन्ही पार्किंग लस घेतल्यानंतर अर्धातास थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लस घेण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्राची गरज आहे. सोमवारपासून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल, डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com