

Shiv Sena Candidate Alleges Election Defeat Due to Black Magic
फुलंब्री : फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदानापूर्वीच दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक ९ मधील भारत माता मतदान केंद्राच्या समोर कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला असून, जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देखील दिली आहे.