

Chhatraapti Sambhajinagar
esakal
फुलंब्री: तालुक्यातील वारेगाव येथे उसाच्या फडात बिबट्याची दोन पिले आढळून आल्याने परिसरात शुक्रवारी (ता. आठ) मोठी खळबळ उडाली आहे. ऊसतोडणी सुरू असताना ही घटना उघडकीस आली असून, ग्रामस्थांसह ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे.