
छत्रपती संभाजीनगर : गायरानधारकांच्या विविध प्रश्नांसाठी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (ता. दहा) थाळीनाद करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून निघालेला मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, किलेअर्क, अण्णा भाऊ साठे चौक असा होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांना निवेदन देण्यात आले.