Chh. Sambhajinagar News: ‘केस मागे घे नाहीतर जीव घेईन!’ वकिलाचा तरुणीला धमकावून जबरदस्तीचा प्रयत्न
Chh. Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरातील गजानन मंदिराजवळ तरुणीला वकिलाकडून कारमध्ये ओढत नेण्याचा आणि चाकूचा धाक दाखवण्याचा धक्कादायक प्रकार उघड. पीडितेने पूर्वीही अनेक तक्रारी दिल्या असून पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : देवदर्शनासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीला वकिलाने कारमध्ये ओढत चाकूचा धाक दाखवत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता.चार) रात्री दहा वाजता गजानन मंदिर परिसरात घडली.